breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

कृषी कायद्याबाबत शहाणपणाची भूमिका घ्या, शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला

मुंबई |

केंद्र सरकारने कृषी कायद्यावरुन वेळीच शहाणपणाची भूमिका घ्यावी. कृषी कायद्यास देशभरातू विरोध होत आहे. हा प्रश्न केवळ एकट्या पंजाब किंवा हरियाणा राज्याचा नाही. संबंध देशभरातील शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलन केवळ दिल्लीपूरतेच मर्यादित राहणार नाही. हे आंदोलन भारतभर पसरेल असा इशाहीरी शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिलेला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांनी राऊत यांची घरी जाऊ भेट घेतली आहे. प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्यानंतर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आवश्य वाचा:मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

शरद पवार या वेळी म्हणाले की, राजधानी दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यायला हवे आहे. इतिहास सांगतो की जेव्हा पंजाब, हरियाणा येथील शेतकरी पेटतो तेव्हा त्याचे लोळ देशभरात पोहोचायला वेळ लागत नाही. आताही या शेतकऱ्यांना देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळताना दिसतो आहे.

केंद्र सरकारने नव्याने संमत केलेल्या कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात केवळ बदलच करु नये. तर, तो थेट मागे घ्यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरु केलेले आहे. गेली दोन आठवडे हे आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलकांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात आतापर्यंत जवळपास पाच बैठका झाल्या आहेत. परंतू या सगळ्या अयशस्वी झालेल्या आहेत. त्यातून अद्यापतरी कोणताही तोडगा निघालेला नाही.

आवश्य वाचा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला ‘हा’ संकल्प!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button