breaking-newsक्रिडा

कृत्रिम वस्तूसाठी कुकाबुरा सक्रिय; चेंडू बाजूने जड करा : वाॅर्नचा सल्ला

मेलबर्न. काेराेनाच्या भीतीने क्रिकेटच्या विश्वात एकच खळबळ उडाली आहे. याची सर्वात माेठी धास्ती आयसीसीने घेतली आहे. त्यामुळेच सध्या चेंडू चमकवण्यासाठी गाेलंदाजांकडून लावण्यात येणाऱ्या लाळ (थुंकी) आणि घामाच्या वापरावर आता आयसीसी पूर्णपणे अंकुश ठेवणार आहे. चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम वस्तूचा वापर करण्यात यावा, असा नवीन अधिकृत नियम तयार करण्यासाठी आयसीसीने पुढाकार घेतला आहे. याची लवकरच अधिकृत घाेषणा केली जाणार आहे.


आयसीसीचा हा संकेत लक्षात घेऊन आता आॅस्ट्रेलियातील कुकाबुरा या चेंडू तयार करणाऱ्या कंपनीनेही कंबर कसली. मेणासारख्या कृत्रिम वस्तूच्या निर्मितीसाठी कुकाबुराने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता मेणाच्या आधारेच गाेलंदाज हे चेंडू चमकवू शकणार आहेत. हे अधिक सहजरीत्या आणि साेप्या पद्धतीने वापरला जाईल, असेच तयार करण्यासाठी सक्रिय असल्याची माहिती कुकाबुराने दिली. याच्या कामाला सुरुवात झाली.

आयसीसीचा निर्णय ठरेल ठाेस :


चेंडू चमकवण्यासाठी मेणासारख्या कृत्रिम वस्तूच्या वापराबाबतचा अधिकृत असा निर्णय खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरेल, असे क्रिकेटच्या तज्ञांचे मत आहे. भविष्यातील काेराेनाचा धाेका लक्षात घेऊनच आयसीसी याबाबतचा नवीन नियम तयार करत आहे. याबाबत गाेलंदाजांनीही चांगली प्रतिक्रिया दिली आहे.


चेंडूसाेबतच्या छेडछाडीसाठी नवा बदल गरजेचा

चेंडू एका बाजूने जड केला का जाऊ शकत नाही. यामुळे सपाट खेळपट्टीवरही चेंडू स्विंग करण्यासाठी माेठा फायदा हाेईल, असे मत शेनवाॅर्नने मांडले. याशिवाय चेंडूला कुरतडण्याच्या अनेक घटनाही आपण राेखू शकताे. त्यामुळे चेंडूशी छेडछाड करणाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा नवा बदल अधिकच गरजेचा ठरेल, असेही त्याने या वेळी सुचवले. त्यामुळे हा निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, असेही ताे म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button