breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कुत्र्याच्या मृत्यूप्रकरणी बोगस पशुवैद्यकांवर गुन्हा दाखल

पुणे – आवडत्या कुत्र्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्या मालकाने कुत्र्याच्या मृत्यूबाबत पाच महिने नेटाने पाठपुरावा केला. त्यातून या कुत्र्यावर उपचार करणारा पशुवैद्य बनावट असल्याचा प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे. एका पशुवैद्याने आपला दवाखाना बोगस पशुवैद्यास चालविण्यास दिला आणि चुकीच्या औषधोपचारांमुळे श्वानाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी चौघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

बोगस पशुवैद्य डॉ. इशिता लाल (रा. फ्युचर्स टॉवर्स, अमनोरा पार्क हडपसर पुणे), डॉ. दिलीप पी. सोनूगे, डॉ. अपूर्वा गुजराथी (पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील जिल्हा चिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. अनिल रामकृष्ण देशपांडे (वय ४७, रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाईदर्शन काळेपडळ येथे राहणाऱ्या योगेश ललित गवळी यांचा आवडता कुत्रा आजारी पडला होता. त्यामुळे त्यांनी ‘जस्ट डायल’वरून माहिती मिळविली आणि पशुवैद्य डॉ. दिलीप पी. सोनुगे यांच्याशी बोलणे केले. त्यांनी मगरपट्टा अॅमनोरा पार्क येथील डॉ. इशिता लाल (माय पेट क्लिनिक) यांच्याकडे पाठवले. डॉ. दिलीप सोनुगे यांनी फोनवरून इशिता लाल यांना कुत्र्यावर उपचार करण्यास सांगितले. डॉ इशिता लाल यांनी डॉ. अपूर्वा गुजराती यांना कामावर ठेवून डॉ. सोनुगे यांचे बनावट लेटर पॅड व रबरी शिक्का तयार केले आणि प्रिस्किपशनद्वारे औषधे दिली. अनेक दिवस उपचार घेऊनही कुत्र्याची प्रकृती सुधारली नाही. त्या उलट कुत्र्याची प्रकृती अधिक बिकट झाली आणि १९ मे २०१८ रोजी त्याचा मृत्यू झाला. आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने गवळी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button