breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

किंचाळण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटवायचा असतो: रोहित पवार

मुंबई| देशामध्ये महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाशी लढा देण्यासाठी अनेक तातडीची पावले उचलताना तितकेच कठोर निर्णयही घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच नेतृत्वकौशल्याचे कौतुक करत आमदार रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

करोना साथीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार झोकून देऊन काम करत आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. करोनाशी दोन हात करताना त्यात कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याचवेळी संचारबंदीच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून ही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या या कुशल नेतृत्वाचे सगळेच जाहीरपणे कौतुक करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्या तत्परतेने प्रतिसाद मिळत आहे ते पाहून सारेच थक्क झाले आहेत. विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच विविध सेलिब्रिटींनीही मुख्यमंत्र्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. या सर्वात भाजपचे काही नेते मात्र उद्धव यांच्या नेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. या टीकेवर रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत टोला हाणला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button