क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर नाव कोरले

खेळ संपताच चॅम्पियन KKR वर पुरस्कारांची बरसात

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम सामन्यांत सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून पराभव करत या हंगामात चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. या हंगामात अनेक रेकॉर्ड्स नव्याने बनले तर अनेक जुने रेकॉर्ड्स तुटले, अनेक नव्या खेळाडूंनी आपल्या खेळाने एक वेगळीच छाप सोडली. विराट कोहली, हर्षल पटेल आणि सुनील नरेनसह अनेक खेळाडूंनी या हंगामात पुरस्कार पटकावले आहेत. तर, कोणाला कोणता पुरस्कार मिळाला जाणून घेऊया.

विजेता संघ
आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली म्हणून कोलकत्ता संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

उपविजेता संघ
आयपीएल २०२४ चा उपविजेता संघ हा हैदराबाद ठरल्यामुळे त्यांना उपविजेतेपदासाठी १२. ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन
हैदराबादचा २१ वर्षीय अष्टपैलू नितीश रेड्डी याला आयपीएल २०२४ चा इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला आहे. रेड्डीने या हंगामात १३ सामन्यात ३३.६७ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आणि गोलंदाजीत तिन बळीही घेतले. नितीशने त्याच्या पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला त्यासाठी बक्षिस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.

स्ट्रायकर ऑफ द सीझन
या हंगामाचा स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कार २२ वर्षीय दिल्ली कॅपिटल्सचा दमदार फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्कला देण्यात आला. मॅकगर्कने या हंगामात मध्ये नऊ सामन्यांमध्ये २३४ स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या यासाठी त्याला बक्षिस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.

फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन
या हंगामात फॅन्टसी प्लेयर ऑफ द सीझन पुरस्काराचा मानकरी सुनील नरेन ठरला, त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले. गोलंदाजीसोबतच नरेनने या हंगामात फलंदाजीतसुद्धा दमदार कामगिरी केली.

सुपर सिक्स ऑफ द सीझन
हैदराबादच्या सलामीवीर अभिषेक शर्माने आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आणि त्यामुळे या पुरस्काराचा मानकरी तो ठरला. त्याने या हंगामात ४२ षटकार मारले आणि त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.

ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन
हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला या हंगामात सर्वाधिक चौकार मारल्याबद्दल ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या हंगामात त्याने एकूण ६४ चौकार मारले आणि त्यासाठी त्याला बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.

कॅच ऑफ द सीझन
कोलकत्ता विरुद्ध लखनौच्या सामन्यात कोलकात्ताच्या रमणदीपने अर्शिन कुलकर्णीचा आवाक्याबाहेरचा झेल घेतल्यामुळे त्याला या हंगामाचा कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार आणि दहा लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले.

मोस्ट वैल्युएबल प्लेयर
आयपीएल २०२४ मधला मोस्ट वैल्युएबल प्लेयर हा सुनील नरेन ठरला. या हंगामात त्याने फलंदाजी करत ४८८ धावा केल्या तर गोलंदाजीत १७ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या पुरस्काराचा मानकरी तो ठरला आणि दहा लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले.

ऑरेंज कॅप
या हंगामात विराट कोहलीने १५ सामन्यांत ६१.७५ च्या सरासरीने ७४१ सर्वाधिक धावा केल्यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला, त्याला त्याच्या या दमदार कामगिरीमुळे दहा लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

पर्पल कॅप
या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना हर्षलने १४ सामान्यत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या आहेत, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला पर्पल कॅप आणि बक्षीस म्हणून दहा लाख रुपये मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button