breaking-newsराष्ट्रिय

काश्‍मीरमध्ये डीएसपीच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला-4 पोलीस ठार

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – काश्‍मीरच्या शॉपियामध्ये डीएसपीच्या ताफ्यावर दहशवाद्यांनी हल्ला केल्याची आणि या हल्ल्यात 4 पोलीसकर्मी शहीद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. डीएसपी मुख्यालयातून एस्कॉर्ट पार्टी निघाली असताना तिच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी चार जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण उपचारादरम्यान ते मरण पावले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांच्या एका गाडीच्या दुरुस्तीसाठी एस्कॉर्ट पार्टी निघाली होती, अशा वेळी अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर दहशतवादी पोलीसांच्या तीन रायफल्स घेऊन पळून गेले. सुरक्षा दलांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी तरून तपासणी सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button