breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काश्मीरमध्ये उद्यापासून पोस्टपेड मोबाइल सेवा पूर्ववत

काश्मीर खोऱ्यात गेले ६९ दिवस संचारमाध्यमांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, या ठिकाणचे सुमारे ४० लाख पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सोमवार दुपारपासून कार्यरत होतील, असे जाहीर केले आहे.

देशभर दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या श्रीनगरमधील पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव व प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ही घोषणा केली. तथापि, २० लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल दूरध्वनी, तसेच मोबाइल व इतर इंटरनेट सेवा सध्या बंदच राहणार आहेत.

केंद्र सरकारने गेल्या ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून, राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, राज्याच्या सर्व उर्वरित भागांमधील मोबाइल सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकेपणाने सांगायचे, तर सर्वच कंपन्यांचे सर्व पोस्टपेड मोबाइल फोन १४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजेपासून पूर्ववत सुरू होतील, असे निवेदन कन्सल यांनी वाचून दाखवले. हा निर्णय काश्मीर प्रांताच्या सर्व १० जिल्ह्य़ांना लागू असेल असे ते म्हणाले.

५ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी प्रशासनाने जी अनेक पावले उचलली आहेत, त्यापैकी ही सर्वात महत्त्वाची घोषणा आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून शैक्षणिक संस्थाही उघडल्या आहेत, मात्र त्यांच्यातील उपस्थिती तुरळक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button