breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: इटलीच्या रस्त्यांवर पडून आहेत शेकडो मृतदेह ?

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं असून याचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. इटलीत एकाच दिवसात हजारो लोकांच्या मृत्यूची नोंद होत आहे. सोशल मीडियावर इटलीमधील भीषण परिस्थिती दर्शवणारे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या फोटोत मोठ्या संख्येने लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत असून हा फोटो इटलीचा असल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे दावा –
फेसबुकवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही युजरने फेसबुकवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, हा फोटो आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपण योग्य वेळी सांभाळण्याची गरज आहे.

सत्य काय ?
खरं म्हणजे या फोटोचा आणि करोना व्हायरसचा एकमेकांशी काही संबंध नाही. हा फोटो जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथील आहे. २४ मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेला हा फोटो एका आर्ट प्रोजेक्टचा भाग होता. नाझींच्या छळछावणीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक अशा पद्दतीने रस्त्यावर झोपले होते.

१९४५ रोजी हिटलरने नाझी कॅम्पमध्ये ५२८ ज्यू नागरिकांना ठार केलं होतं. त्या सर्वांचे मृतदेह फ्रँकफर्ट येथील केंद्रीय दफनभूमीत दफन करण्यात आले होते. या सर्व पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २४ मार्च २०१४ मध्ये आर्ट प्रोजेक्ट आयोजित करण्यात आला होता.

महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यातही हाच फोटो चीनमधील करोनाचं भीषण वास्तव दर्शवणारं असल्याचा दावा करत व्हायरल झाला होता. फेब्रुवारीच्या अखेर इटलीत करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. काही दिवसांतच हजारो लोकांना विषाणूंची लागण झाली. इटलीमध्ये करोनाची लागण झाल्याने पाच हजाराहून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून परिस्थिती भयानक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button