पिंपरी / चिंचवड

काळेवाडीतील काकडारती सोहळ्याची सांगता

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काळेवाडीतील विठ्ठलराज भजनी मंडतर्फे काकडारती सोहळ्याची सांगता करण्यात आली. काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची समाप्ती झाली. भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

हभप चंद्रकांतमहाराज वांजळे यांचे काल्याचे कीर्तन झाले. श्रीकृष्णाचे चरित्र उलगडून सांगतानाच त्यांनी काकाडारतीचे महत्व विषद केले. नगरसेवक नाना काटे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, महापालिकेचे माजी स्वीकृत सदस्य आणि सोहळ्याचे मुख्य संयोजक नवनाथ नढे,‍ माजी नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेविका उषा काळे, विनोद नढे, संतोष कोकणे, सुरेश भोईर, दिलीप बालवडकर, सखाराम नखाते, देवाप्पा नखाते आदी या वेळी उपस्थित होते.

हभप चंद्रकांतमहाराज वांजळे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जीवनात अध्यात्म भाव जपला पाहिजे. त्यामुळे आपले जीवन सात्विक होते. धकाधकीमुळे आपली दिनचर्या बदलली आहे. दररोज उगवत्या सूर्याचे प्रत्येकाने भक्तीमय वातावरणत स्वागत करावे. त्यामुळे आपला प्रत्येक दिवस चांगला होईल. त्यामुळेच काकडारतीचे अनन्य साधारण महत्व आहे.

काल्याचे कीर्तन श्रवण करण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन झाल्यानंतर दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी ट्रस्ट आणि काळेवाडी विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button