breaking-news

काळाचा घाला! नवीन वर्षाचा सूर्य पाहण्यासाठी ती चिमुकली या जगात नाही

नवीन वर्षाचे स्वागत करण्यात सगळे व्यस्त असताना पिंपळे-गुरव येथील कडलग कुटुंबिय मात्र दु:खात आहेत. त्यांच्या घरातील लाडकी परी लावण्या आज त्यांच्यासोबत नसल्याने त्यांच्यासमोर दु:खाचा डोंगर उभा राहिला आहे. सोमवारी लावण्याच्या आत्याचा विवाह संभारभ होता, त्यासाठी सकाळपासूनच ६ वर्षाची लावण्या आई चेतना, वडील सचिन यांच्यासह पिंपळे गुरव मधील त्याच्या घरी होती. परंतु लावण्या आज कायमची आपल्यापासून दुरावणार याची तिच्या कुटुंबियांना अजिबातच कल्पना नसेल. ज्ञानेश्वर पार्क येथे दुपारी मित्रमंडळींसोबत चेंडू खेळत असताना काळाने तिच्यावर घाला घातला. मोटारीने दिलेल्या धडकेत लावण्या गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले,परंतु डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

या घटनेमुळे कडलग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे मावळत्या वर्षाचा सूर्य आणि उगवत्या वर्षाची पहाट पाहण्यासाठी ती या जगात नाही. कडलग कुटुंबातील या लाडक्या आणि एकुलती एक असलेल्या लावण्यावर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. खेळकर, अत्यंत गोड स्वभाव असे वर्णन तिच्या सोसायटीत राहणाऱ्यांनी केले. दरम्यान या घटनेप्रकरणी चालक दिलीप खंडू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील तीन महिन्यांपासून लावण्या आईसोबत त्यांच्या गावी होती. नुकतीच ती परत आली होती. नुकताच डिसेंबर महिन्यात लावण्याचा वाढदिवस झाला, तो कडलग कुटुंबियांसाठी शेवटचा ठरला. तर दोन दिवसांपूर्वी लावण्याच्या आईचाही वाढदिवस झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे ती राहत असलेली सोसायटी दुःखात असून वर्षाचा शेवटचा आणि पहिला दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही असे तिचे शेजारी म्हणाले. दरम्यान वाहनचालकांनी वाहने चालवताना योग्य ती काळजी घ्यावी, तसेच पालकांनीही मुलांना खेळायला पाठवताना काळजी घ्यायला हवी हेच या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button