ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत; औरंगाबादमध्ये गुंडाच्या दहशतीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

औरंगाबाद |  शहर पोलीस हद्दीतील वाळूज भागात पुन्हा एकदा गुंडाचा धुमाकूळ आणि दहशत पाहायला मिळाली. दारू पिऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून पैसे मागणे  आणि न देणाऱ्या लोकांना या गुंडांकडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यातील एका आरोपी तडीपार असल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात दहशतीचे वातावरण आहे.

बुधवारी संध्याकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास चार गुंडानी मुख्य रस्त्यावरील प्रताप चौकालगत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धमकावत पैसे वसूल करण्यास सुरूवात केली. तर पैसे देण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना मारहाण सुद्धा केली. तर याच गुंडांनी यावेळी तीन नागरिकांना रक्तबंबाळ होईपर्यंत निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका तडीपार गुंडही सामील असल्याचे दिसून येतंय. तो या टोळीचा म्होरक्या असल्याचे बोलले जात आहे.

या गँगचा म्होरक्या असलेला प्रशांत उर्फ सोनू संपतराव आमटे (वय २१रा. साईनगर सिडको महानगर वडगाव कोल्हाटी ) नावाचा गुंड आहे. त्याला सहा महिन्यांपूर्वीच दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार असूनही तो या भागात बिनधास्त वावरत असतो. नागरिकांकडून पैसे वसूल करून त्यांना मारहाणही करत असतो.

शहारत घडत असलेल्या काही दिवसांपासूनच्या घटना पहिल्या असता शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत. काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर भागात दुर्लभ कश्यप गँगच्या गुंडांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थाला मारहाण केली होती. याशिवाय कालच पोलिसांनी शहरात कुरियरमधून आलेल्या ३७ तलवारी जप्त केल्या आहेत. त्यातच आता वाळूज भागात गुंडाचा पुन्हा एकदा राडा पाहायला मिळाल्याने औरंगाबाद शहरात नेमकं चालले तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button