breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कांदिवलीमध्ये शाळकरी मुलीची इमारतीच्या 8व्या उडी मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

मुंबई – नववीत शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर व्हिलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. दरम्यान, मुलीच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही मुलगी गार्डिंनिया इमारतीतील रहिवासी होती. गुरुवारी (28 जून) तिनं शेजारी असलेल्या गुंडेजा इमारतीच्या आठव्या मजल्यावर  उडी मारुन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला तातडीनं साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी समतानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button