breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष, पण अंतर्गत वादामुळे जर्जर झाला : संजय राऊत

मुंबई | काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत खुप समस्या आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस जर्जर झाली आहे. याची मला वेदना आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचं वैभव आता राहिलं नाहीय. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

याचा फटका महाराष्ट्रात बसणार नाही. महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. पक्षातल्या तरूणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे. गट तट सगळ्यांकडे असतात विरोधी पक्षातही असे गट आहेत, असंही ते म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिर आंदोलन, सुशांत प्रकरण, काँग्रेसमधील वादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. शरद पवारांसारखे अनेक नेते हे काँग्रेसमधून का बाहेर पडतात? असंही ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, असे राऊत म्हणाले. मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ते म्हणाले, मंदिराचेही अर्थकारण आहे. अनेकांचे उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहेत. पुजारी आहेत, मंदिराबाहेर हार- फुले, प्रसादाची दुकाने असतात. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहोचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील, तर भाजपने सरकारशी चर्चा करावी. मंदिर हे उदरनिर्वाहाचेच साधन आहे, भूतलावरची प्रत्येक क्षेत्र उदरनिर्वाहाचे साधन आहे, असंही राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button