breaking-newsताज्या घडामोडीपुणे

काँग्रेसला धक्का, कल्याणराव काळे करणार भाजप प्रवेश

पंढरपुर –  लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यावरुन काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडत असताना आता पक्षाला पंढरपूरमधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी जिल्ह्यातील बडे नेते पक्षात घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात काळे भाजपमध्ये प्रवेश करतील. जर काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याचा पहिला फटका शरद पवार यांना बसण्याची शक्यता आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माढा मतदारसंघातील काही भागात काळे यांचा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीतील निकाल फिरवण्यासाठी काळे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच भाजपकडून देखील त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे काळे हे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे काळे यांचा भाजप प्रवेश शिंदे यांच्यासाठी देखील धक्का असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button