breaking-newsपुणे

काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी पुण्यातील तरुणाच नाव चर्चेत

पुणे – राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. अशातच आता पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाने काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा तरुण यासाठी काँग्रेसकडे याबाबत लवकरच पत्रही पाठवणार आहे. पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेला गजानंद पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांच्याजागी कोणाची निवड करायची यावर पक्षामध्ये संभ्रम आहे. या परिस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची माझी इच्छा आहे असे गजानंद होसलेन सांगितल आहे.

पक्षातील या सर्वोच्च पदासाठी अनेक दावेदारांची नावं समोर आली आहेत. आतापर्यंत ज्यांची नावे समोर आली आहेत ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ता आहेत. मात्र, आता या यादीत असं एक नाव जोडलं गेलं आहे जो काँग्रेस पक्षाचा नेता ही नाहीये आणि कार्यकर्ता सुद्धा नाहीये. होय, पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाला राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपद सांभाळण्याची इच्छा आहे. राजकारणात काही अनुभव आहे का ? किंवा कुठल्या सामाजिक संघटनेबरोबर काम केले आहे का? या प्रश्नावर गजानंदने नाही असे उत्तर दिले. होसाळे काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यही नाही. मंगळवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याआधी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे गजानंदने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button