breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?

बंगळूरू : काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटकाबाहेर पाठवणार आहे. त्यातच केरळ पर्यटनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, मात्र त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.

आपल्याकडे 118 आमदारांचं बळ असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. काँग्रेस (78), जेडीएस (38) यांचे 116 आमदार असून दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने जेडीएससोबत सत्ता स्थापन करण्याचा विश्वास काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्याआधी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता.

काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास संबंधित काँग्रेस आमदार तयार नसल्याची माहिती आहे. हे सातही आमदार लिंगायत समाजातील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button