breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन; गोयल यांच्या पुस्तकाचा तीव्र निषेध

मुंबई | महाईन्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भाजप कार्यकर्ते जय भगवान गोयल व त्यांच्या पक्षाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने उद्या मंगळवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केलेली आहे. मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू केलेला आहे. ‘आजके शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केलेला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button