breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अमित शहांच्या जागी भाजपचा ‘हा’ नेता होणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा.  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पण, शहा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्याजागी आता भाजप कोअर कमिटीकडून नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हे भाजपचे अध्यक्ष होणार आहे. २० जानेवारी रोजी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. भाजप अध्यक्षाची निवडणूकीसाठी १९ जानेवारी रोजी नामांकन दाखल केले जाती. सध्या नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे.

पक्षाच्या संविधानानुसार ५० टक्क्यांहून अधिक  संघटनांची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. भाजपचे निवडणूक अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हे पुढच्या दोन तीन दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. जे पी नड्डा अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील आणि तेच अध्यक्ष होतील असे समजले जाते. २० जानेवारी रोजी भाजपला जे पी नड्डा यांच्या रुपाने नवीन अध्यक्ष मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री, कंद्रीय मंत्र्यांसह अनेक प्रदेशाध्यक्ष नड्डा यांच्या नावाला अनुमोदन देतील.

भाजपचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकल २०१९ च्या जानेवारी महिन्यातच संपला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांना पदावर राहण्यास सांगण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा जे पी नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात अला होता. जे पी नड्डा हे पुढील भाजपचे अध्यक्ष होणार असून फेब्रुवारी महिन्यात ते पक्षाचा कार्यभार स्विकारतील, अशी माहिती भाजप पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button