breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 5 नवे रुग्ण

ठाणे | जगभरात थैमान घालणारा कोरोना महाराष्ट्रात फोफावत चालला आहे. कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी (2 एप्रिल) 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर पोहचला आहे. या 5 मधील 4 रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि 1 रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे.

आतापर्यंत कल्याणमध्ये 7 रुग्ण तर डोंबिवलीत 12 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेने सर्वेक्षण सुरु केले असून जंतुनाशक फवारणी सुरु केली आहे. डोंबिवलीत रुग्णाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण डोंबिवली शहर सील करण्यात आलं असून वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल 5 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण आढळून आले. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्‍णसंख्‍या आता 19 झाली आहे. नवीन रुग्‍णांपैकी 4 रुग्‍ण हे डोंबिवली पुर्व भागातील असून 1 रूग्‍ण कल्‍याण पुर्व परिसरातील आहे. डोंबिवली येथील 3 रुग्‍ण हे लग्‍न सोहळयाशी संबधीत आहे. तर 1 रुग्‍ण कोरोनाबाधित रुग्‍णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button