breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करा

  • कॉंग्रेसचे मोदी आणि शहांना थेट आव्हान

  • आज लोकशाही बचाव दिन पाळणार 

  • देशभरात काढणार निषेध मोर्चे, धरणेही

नवी दिल्ली – संख्याबळाबाबत इतका विश्‍वास वाटत असेल तर कर्नाटक विधानसभेत उद्याच (शुक्रवार) बहुमत सिद्ध करून दाखवा, असे थेट आव्हान कॉंग्रेसने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिले. दरम्यान, कर्नाटकमधील घडामोडींचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस उद्या लोकशाही बचाव दिन पाळणार आहे. यावेळी देशभरात निषेध मोर्चे काढले जाणार असूून धरणेही धरले जाणार आहेत.

येडियुरप्पांनी मागील दाराने प्रवेश केला आहे. त्यामुळे मोदी आणि शहा हे दोघेही त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. देशात पक्षांतरबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू आणि सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी दिली. कॉंग्रेसचे आणखी एक नेते रणदीप सुर्जेवाला यांनीही कर्नाटकमधील घडामोडींवरून तीव्र प्रतिक्रिया दिली. सुर्जेवाला यांनी येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत नसल्याचे म्हणत त्यांचा एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
राज्यपाल वजुभाई वालांना माघारी बोलावण्याची मागणी

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांना माघारी बोलावण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे. त्यासाठी त्या पक्षाने गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी 2011 मध्ये केलेल्या मागणीची आठवण करून दिली. कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल एच.आर.भारद्वाज भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला छळत असल्याचा आरोप करत मोदींनी त्यांना माघारी बोलावण्याची मागणी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button