breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात चालत्या पीएमपी बसचे चाक निखळले

पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) मनपा ते केशवनगर या बसचे चाक शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रवासादरम्यान अचानक निखळले. या वेळी बसमध्ये प्रवासी होते. मात्र, बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेनंतर ती बस डेंगळे पुलाजवळ दोन ते अडीच तास रस्त्यातच उभी होती.

मनपा भवन बसस्थानकावरून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केशवनगरच्या दिशेने बस निघाली होती. डेंगळे पुलावरून जात असतानाच बसचे उजव्या बाजूचे समोरील चाक रॉड तुटल्याने निखळले. त्यामुळे बस पूर्णपणे एका बाजूला झुकली. बसमधील प्रवाशांना त्यामुळे हादरा बसला. साधारण तीन वाजण्याच्या सुमारास ही बस हलविण्यात आली. ही बस खासगी कंत्राटदाराची होती, अशी माहिती पीएमपीच्या जनसंपर्क विभागाने दिली.

दुपारी साडेबारा ते तीन दरम्यान कंत्राटदार कंपनीने बस हलविण्यासाठी दोन ते तीन वेळा प्रयत्न केला. मात्र, उच्च क्षमतेची क्रेन उपलब्ध न झाल्याने ती हलवता आली नाही. ‘हायड्रोलिक क्रेन’ आणून बस हलविली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button