breaking-newsमुंबई

कर्नाटक विधानसभा निवडणूक : मुंबईत भाजपची सेलिब्रेशनची जय्यत तयारी

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपने मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयाबाहेर जय्यत तयारी केली आहे. भाजपाने एलआयसी इमारतीपासून स्वत:च्या कार्यालयापर्यंत पक्षाचा झेंडा फिरवला असून बाहेर निकाल पाहण्यासाठी स्क्रिन लावली आहे. भाजप कार्यालयाबाहेर भगव्या रंगाचा स्टेज उभारण्यात आला असून बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाने विजयाचे जंगी सेलिब्रेशन करण्याची पूर्ण तयारी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून सध्या जे कल हाती आले आहेत त्यानुसार त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button