breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात १ वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान

बंगळूरू : काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ३७  टक्के मतदान झाले आहे. २०१३ च्या तुलनेत मतदानाचा हा कल चांगला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. विधानसभेच्या २२२ जागांसाठी सुमारे ५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा आणि जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम देशाच्या राजकारणावर होणार असल्याने या निवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button