breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

एक राजा बिनडोक तर दुसरा.., प्रकाश आंबेडकरांची उदयनराजे व संभाजीराजेंवर जहरी टीकास्त्र

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी पुण्यात मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मात्र, ही घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केलेली आहे.

उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता ‘एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्यांचं आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर. राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केलेला आहे. मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला वंचित आघाडीचा पांठिबा राहिल, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. पाठिंबा देण्यासाठी सुरेश पाटील यांनी आपल्याकडे विनंती केली होती. मराठा आरक्षण वादामुळे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ बिघडू नये, असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button