breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकची सत्ता कुणाकडे? आज फैसला

बंगळूर – कर्नाटकची सत्ता कुणाकडे याचा फैसला आज (मंगळवार) होणार आहे. कॉंग्रेस त्या राज्यातील सत्ता टिकवणार की भाजप सत्ता खेचून घेणार याचे उत्तर मतमोजणीतून मिळणार आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्यातील 222 जागांसाठी 12 मे यादिवशी सुमारे 70 टक्के मतदान झाले. आता उद्या सुमारे 40 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारी बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होऊन सायंकाळी सर्व निकाल हाती येणे अपेक्षित आहे. कर्नाटकात 1985 पासून प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी बदलले आहेत. ही स्थिती कायम राहणार की बदलणार हे निकालामुळे स्पष्ट होईल. मतदानोत्तर चाचण्यांनी त्या राज्यात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे भाकीत केले आहे.

काही चाचण्यांनी कॉंग्रेस तर काहींनी भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवला आहे. चाचण्यांच्या निष्कर्षानुसार कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी टाईट रेस होणार आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस हा पक्ष कुणाला सत्तेवर आणायचे हे ठरवणारा किंगमेकर बनण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी कायम राहणार की भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांच्याकडे सुत्रे जाणार याचे उत्तर निकालामुळे मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button