breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय
कर्नाटकचा उसैन बोल्ट : श्रीनिवास गौडा याने १४२.५ मीटर अंतर पार केले अवघ्या १३.६२ सेकंदात
बंगळुरू । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
मुदबिद्री येथील श्रीनिवास गौडा, मंगरूरूने याने म्हशींच्या शर्यतीत १४२.५ मीटर अंतर अवघ्या १३.६२ सेकंदात पूर्ण केले. कद्री येथे म्हशींच्या शर्यती घेतल्या जातात. त्याला कांबाला असे संबोधले जाते. कद्री येथे शेतात ही स्पर्धा झाली.
स्थानिक नागरिक माझी तुलना जगजेता उसैन बोल्ट याच्याशी करतात. मी केवळ शेतात धावलो आहे. पण, उसैन बोल्ट तर विश्वविजेता आहे, अशा भावना श्रीनिवास गौडा याने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘साई’च्या आघाडीच्या प्रशिक्षकांच्या चाचणीसाठी श्रीनिवास गौडा याला आमंत्रित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री मीन किरेन रिजीजू यांनी दिली.