breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कर्जत ते पनवेल लोकल सेवा सुरु करा, शिवसेना खासदार बारणे यांची मागणी

पिंपरी|महाईन्यूज|

मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत ते पनवेलपर्यंत रेल्वेची लोकलसेवा तात्काळ सुरु करण्यात यावी. लोकलसेवेसाठीच्या जमीन अधिग्रहण करणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्याला गती द्यावी. लोकलसेवा चालू करुन कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली आहे.

शून्य प्रहराच्या वेळेत खासदार बारणे यांनी कर्जत ते पनवेलपर्यंतच्या लोकलचा प्रश्न मांडला. मावळ लोकसभा मतदारसंघात कर्जत ते पनवेलपर्यंत लोकलसेवा चालू करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून मी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. त्याकरिता अर्थसंकल्पात देखील तरतूद केली होती. कर्जत, पनवेल हा पुर्ण भाग मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येत आहे. मुंबईच्या जवळ आहे. त्यामुळे लाखो लोक प्रवास करत आहेत. त्यामध्ये कर्मचारी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी यांची संख्या अधिक आहे.

कर्जत ते पनवेलपर्यंत लोकलसेवेसाठीच्या जमीन अधिग्रहण करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे लाईन चालू झाली नाही. त्याला विलंब होत आहे. कर्जत ते पनवेलपर्यंत लवकरात-लवकर रेल्वे सेवा चालू करावी. जेणेकरुन कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांना प्रवास करण्याची व्यवस्था होईल, असे बारणे यांनी म्हटले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button