breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

करोनावर मात करण्यासाठी महापालिकेच ‘PCMC Smart Sarathi’ मोबाईल अँप

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध शंकांचे निरसण व्हावे, कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत ? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व शासनाचे निर्देश आणि सुचनांची माहिती नागरिकांना व्हावी, यादृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आज मंगळवारी (दि. २४) “पीसीएमसी स्मार्ट सारथी” मोबाईल अँप नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केला आहे.

मोबाईल अँप हा गुगल प्ले स्टोअरवरून एन्ड्राईड मोबाईलधारकांसाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे एपल युजर्सकरीता हे मोबाईल अँप, अँप स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅप डाऊनलोड करण्यासाठी PCMC Smart Sarathi या नावाने सर्च करावे. मोबाईल अँप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर या अॅपवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) करून अॅपचा वापर करता येईल. सद्यस्थितीत नागरिकांना शहरामध्ये सुरू असलेल्या विविध घडामोडींची माहिती तत्काळ उपलब्ध होईल यादृष्टीने महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधांचा एक भाग म्हणून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनाशी संबंधीत आरोग्य विषयक सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या अँपद्वारे नागरीकांना कोविड – १९ बाबत चेकलिस्ट उपलब्ध करून देणेत आलेली असून सदर चेकलिस्टद्वारे कोविड – १९ या विषाणूच्या लक्षणाबाबत एकूण १३ प्रश्न विचारणेत आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर महापालिकेस संबंधित नागरिकाची आरोग्य विषयक संपुर्ण माहिती उपलब्ध होणार असून मनपाचे वैद्यकीय अधिकारी त्या नागरीकाशी व्यक्तीशहा संपर्क साधून वैद्यकीय उपचाराबाबत पुढील कार्यवाही करतील. या अँपचा वापर केल्याने नागरिकांस तत्काळ सेवा वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेस मदत होईल. तसेच, याव्यतिरिक्त वेळोवेळी मोबाईल अॅपद्वारे घरीबसून नागरिकांना जास्तीत जास्त सेवा भविष्यात उपलब्ध करून देणेत येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button