breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा किंग्स इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय

अबुधाबी – आयपीएलच्या १३व्या मोसमात काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्यात कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पंड्या आणि किरॉन पोलार्ड यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा केल्या होत्या. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत केवळ ८ बाद १४३ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने पंजाबचा ४८ धावांनी पराभव केला.

मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहने मयांकचा (25) त्रिफळा उडवला. त्यानंतर कृणाल पांड्याने करुण नायरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केले. अशा प्रकारे पंजाबचे दोन फलंदाज 39 धावांत माघारी पतले. तर राहुल चहरच्या गोलंदाजीवर स्कूप मारण्याच्या नादात के एल राहुलचा त्रिफळा उडाला. पंजाबने 10 षटकांत 3 बाद 72 धावा केल्या. मुंबई इंडियन्सपेक्षा या धावा अधिक होत्या, परंतु पंजाबने एक अतिरिक्त विकेट गमावली होती. ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करताना पंजाबच्या आशा कायम राखल्या. मात्र जेम्स पॅटिन्सनने ही भागीदारी संपुष्टात आणली. पूरनने 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या. परंतु त्यानंतर पंजाबचा डाव ढासळत गेला. त्यांना केवळ १४३ धावांवर मजल मारता आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button