breaking-newsताज्या घडामोडी

करोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणाची कागदपत्र पडताळणी स्थगित

नाशिक | महाईन्यूज |

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने १८ मार्च रोजी नियोजित केलेली तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ उमेदवारांचा कागदपत्र पडताळणी कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला आहे. महावितरणचे नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर यांनी ही माहिती दिली. या बदलाची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहानही महावितरण प्रशासनाने केले आहे.

शासन करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असून, त्यानुसार महावितरणच्या नाशिक परिमंडळात नाशिक शहर मंडळ व मालेगाव मंडळ या अंतर्गत तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ उमेदवार पदाकरिता १८ मार्च रोजी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार होती. या भरती प्रकियेदरम्यान संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, तसेच करोना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही पडताळणी तात्पुरती स्थगित केली असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडळअंतर्गत असलेल्या नाशिक शहर मंडळामध्ये १४९ तथा मालेगाव मंडळमध्ये १२५ तारतंत्री व वीजतंत्री या शिकाऊ पदाची निवड करण्यासाठी एकलहरे, नाशिक, तसेच मालेगाव येथे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार होती. पडताळणीचा हा नियोजित कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या भरतीप्रकियेची पुढील प्रक्रिया व कागदपत्रे पडताळणीसंदर्भातील तारीख माध्यमातून स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button