breaking-newsमनोरंजन

‘कबीर सिंग’मधील शाहिदचा लूक प्रदर्शित

‘पद्मावत’नंतर शाहिद कपूर कुठल्या चित्रपटांमधून दिसणार याबद्दल चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्याने फार किचकट भूमिका न स्वीकारताही त्यातल्या त्यात वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांची निवड केली. पण ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. या चित्रपटानंतर तो ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. त्याचा फर्स्ट लूक शाहिदने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये शाहिद क्लीन शेव्हमध्ये दिसत आहे. ‘अर्जुन रेड्डी’च्या या हिंदी रिमेकचं नाव ‘कबीर सिंग’ असं आहे. मूळ चित्रपट मस्त जमला आणि बॉक्स ऑफीसवर तो हिटही झाला आहे त्यामुळे खरंतर या चित्रपटाचा रिमेक व्हायलाच नको, हेच आपलं मत होतं असं तो म्हणतो. मात्र हा चित्रपट आणि त्यातील व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर आपण ती करायला हवी, हा विचार स्पर्शून गेला आणि म्हणूनच या चित्रपटाला होकार दिल्याचं तो म्हणाला. या रिमेकमध्ये शाहिदसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. यामध्ये शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button