breaking-newsताज्या घडामोडी

कचरा, स्वच्छतागृह साफसफाईवरुन तक्रारी येता कामा नयेत, महापाैरांच्या अधिका-यांना सुचना

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड जागोजागी कच-याचे ढीग पडले आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नाही. कचरा गोळा करणा-या घंटागाड्या वेळेवर पोहोचत नाहीत. शिवाय दररोज गाड्याही येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न त्यांना पडत आहे. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना फैलावर घेतले.  

महापौर राहुल जाधव यांनी दालनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत उपस्थित होत्या.

शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाही. कचरा गाडी दररोज येत नाही. रस्ते साफ केले जात नाहीत. दुचाकीवरुन चालले तरी रस्त्यावरील धूळ उडत आहे. सार्वजनिक स्वच्छातागृहे साफ केली जात नाहीत. यावरुन महापौरांनी अधिका-यांना फैलावर घेतले. शहर स्वच्छ राहिले पाहिजे. त्यासाठी जी मदत लागेल ती मदत करण्यास आपण तयार आहोत. परंतु, शहर स्वच्छतेच्याबाबतीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

कामचुकार अधिका-यांना वटणीवर आणले जाईल. जबाबदारी झटकणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कचरा संकलन करणा-या गाड्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. सुट्टीच्या दिवशी देखील कार्यशाळा चालू ठेवावी, अशा सूचना त्यांनी कार्यशाळा विभागाला दिल्या. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, गाड्यांची कमतरता आहे. कार्यशाळेतून गाड्या लवकर दुरुस्त करुन दिल्या जात नाहीत. शनिवार, रविवार दोन दिवस कार्यशाळा बंद असते. त्यामुळे अडचणी येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button