breaking-newsराष्ट्रिय

कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यवधींचा चुना

चारा, कोळसा, 2 जी असे अनेक घोटाळे आजवर उघडकीस आले. अशाच घोटाळ्यांमध्ये आता आणखी एक नवा ‘कंडोम’ घोटाळा उघडकीस आला आहे. आपल्या देशात कंडोम तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला कोट्यवधींचा चुना लावला आहे. यात मुख्य बाब म्हणजे यात खुद्द दोन सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे.

नुकत्याच ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ने (सीआयआय) या संदर्भात चौकशी केली. चौकशीदरम्यान, हा कंडोम घोटाळा उघडकीस आला. सरकारी कंपनी एचएलएल लाईफकेअर, टीटीके प्रोटेक्टिव डिव्हायसेस लिमिटेड यांचाही यामध्ये समावेश आहे. 2010 ते 2014 दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मोफत कंडोम वितरणासाठी मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बोली प्रक्रियेत 11 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. परंतु या कंपन्यांनी संगनमताने कंडोमचे विक्री दर वाढवून सांगितले होते. त्यामुळे त्यात कमी किंमतीची बोली लागली नाही.

अखेर ज्या बोली लावण्यात आल्या, त्यातील कमी किंमतीच्या बोली लावणाऱ्याची निवड करत मंत्रालयाने कंडोमची खरेदी केली होती. या कंपन्यांनी संगनमताने जास्त दराची निविदा दिली आणि इतर कंपन्यांनी त्याला आव्हान दिले नसल्याचे समोर आले. ‘मेडिकल प्रोक्युअरमेंट एजन्सी सेंट्रल मेडिकल सर्विसेस सोसाइटी’ला आता कंडोम खरेदी करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. त्यानंतर हा घोटाळा समोर आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यामध्ये कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मलिदा वाटून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित कंपन्यांना पाठवण्यात आलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरेही कंपन्यांनी अद्याप दिलेली नाहीत. तसेच ज्या कंपन्या याप्रकरणी दोषी आढळतील, त्यांना त्यांच्या वार्षिक नफ्याच्या 3 पट किंवा सरासरी नफ्याच्या 10 टक्के यातील जी रक्कम मोठी असेल ती दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे.

अनोंदिता हेल्थकेअर, क्यूपिड लिमिटेड, मर्केटर हेल्थकेअर लिमिटेड, कॉन्वेक्स लेटेक्स प्रायव्हेट लिमिटेड, जेके अँसेल प्रायव्हेट लिमिटेड, यूनिव्हर्सल प्रॉफिलेक्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडस मेडिकेअर लिमिटेड, एचएलएल लाईफकेअर, टीटीके प्रोटेक्टिव डिवायसेस, सुपरटेक प्रॉफिलेक्टिक्स (इंडिया) लिमिटेड आणि हेवेया फाईन प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा या घोटाळ्यात समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button