breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

औरंगाबाद येथे एमटीडीसीचे जपानी रेस्टॉरंट; जपानी पर्यटकांची सोय, पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत!

मुंबई |महाईन्यूज |प्रतिनिधी

औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ या ठिकाणी असलेला बौद्ध जपानी पर्यटकांचा ओघ पाहता या पर्यटकांच्या सोयीसाठी औरंगाबाद येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) जपानी रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एमटीडीसीच्या पर्यटक निवासातील उपहारगृहात भारतीय खाद्यपदार्थांबरोबर आता जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे जपानी पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिमन्यू काळे यांनी ही माहिती दिली.

जपानी खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देणारे एमटीडीसी हे देशातील पहिले शासन अंगीकृत महामंडळ आहे. जपान येथील वाकायामा प्रांतातील शिष्टमंडळाच्या हस्ते रेस्टॉरंटचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. शिष्टमंडळात वाकायामा प्रांताचे विधीमंडळ सदस्य तसेच वाकायामाचे भारतामधील प्रतिनिधी होते. शिष्टमंडळाचे महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे एमटीडीसीचे मुख्य लेखाधिकारी श्री. दिनेश कांबळे यांनी स्वागत केले. उद्घाटनानंतर शिष्टमंडळाने उपहारगृहातील जपानी खाद्यपदार्थं सुशी, टेंपुरा, रामेन नुडल्स, चिकन तुरीनोकरागे, मीसोसुप याबरोबरच भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

वाकायामा प्रांतातील विधीमंडळ सदस्य नाकाशीनी म्हणाले की, जपानी लोकांना भारतीय खाद्यपदार्थ खूप आवडतात. त्यामध्ये इंडियन करी, चपाती, रोटी, चिकन तंदुरी, समोसा हे विशेष लोकप्रिय आहेत. आता याबरोबरच औरंगाबाद येथे जपानी खाद्यपदार्थही उपलब्ध झाल्याने जपानमधील पर्यटकांची मोठी सोय होईल. एमटीडीसीचे हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे, असे त्यांनी नमूद केले.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिमन्यू काळे म्हणाले की, जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांमुळे जपानी पर्यटक औरंगाबाद येथे भेटीकरिता येत असतात. या जपानी उपहारगृहामुळे पर्यटकांना विशेष सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या वाढीस नक्कीच हातभार लागणार आहे.

उपहारगृह उद्घाटनप्रसंगी एमटीडीसीचे मुख्य लेखाधिकारी दिनेश कांबळे, मुख्य लेखापाल निलेश कांबळे, निवास व्यवस्थापक शेख नदीम, जपानी दुभाषक स्वाती भागवत, उपहारगृह व्यवस्थापक निता कांबळे यांच्यासह तुषार तिनगोटे, अंजली बडवे, मनिषा बिरादार, हेमा साळुंके, योगेश राणे, सचिन जमधडे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button