breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. “आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आत्ताही अंधारात काही झाडं तोडल्याची माहिती मिळत आहे. आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊपर्यंत आरेतील एक पानही तोडलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आरे कारशेडला स्थगिती दिली. मला रात्रीची झाडांची कत्तल चालणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही, माझी मेट्रोला स्थगिती नाही, तर कारशेडला स्थगिती आहे. आरेमधलं पानही तोडलेले मला चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.