breaking-newsताज्या घडामोडी
औरंगाबादकरांची चिंता वाढली ; आज दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले
औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पार झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या दोन महिला रुग्णांची (वय 35, 65) चाचणी आज पहाटे पॉझिटिव्ह आल्याने नवीन दोन रुग्णांची भर पडली. या महिला अनुक्रमे असेफिया कॉलनी आणि समता नगर येथील आहेत, अशी माहिती मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
यासोबत औरंगाबादमधील कोरोना बाधितांची संख्या 51 वर पोहोचली आहे. सध्या मिनी घाटीत एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत 4 अशा एकूण 24 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 22 जण बरे होऊन घरी गेलेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 51 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबादेत आढळले आहेत, असेही डॉ. कुलकर्णी यांनी कळवले आहे.