breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

ऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन

नवी दिल्ली – Whatsapp वर खूप सारे फीचर्स मिळत आहेत. परंतु, एका फीचरची उत्सूकता संपत नाही. जर तुम्हाला उशीरा रात्री पर्यंत चॅटिंग करण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी हे फीचर खास आहे. व्हॉट्सअॅपवर जाताच युजर्सचे स्टेट्स ऑनलाइन दिसत असते. त्याला लपवले जावू शकत नाही. परंतु, जर कोणत्याही युजरची चॅट विंडो ओपन करा. ते अॅप युज करीत असल्यास त्याच्या नावाच्या खाली ऑनलाइन लिहिलेले दिसेल.

जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन दिसत असेल तर चॅटिंग करायला आवडते. सध्या अॅप मध्ये कोणतीही सेटिंग किंवा ट्रिक यासाठी नाही आहे. अॅपवर ऑनलाइन दिसले म्हणून नुकसान हे आहे की, बाकीच्यांना तुम्ही ऑनलाइन असून कुणासोबत तरी चॅटिंग करीत असाल, असे वाटते. याशिवाय तुम्ही ऑनलाइन आहात म्हणून कुणीही मेसेज करीत असतात. आवश्यक नाही की, तुम्ही कोणासोबत चॅटिंग करीत आहात तसेच ऑनलाइन दिसण्याचा अर्थ तुम्ही त्यांचे मेसेज कडे दुर्लक्ष करीत आहात, असाही अनेक जण अर्थ काढत असतात.

फॉलो करा या सोप्या स्टेप्स
व्हॉट्सअॅपवर विना online पाहण्यसाठी किंवा Last seen बाकीच्या सोबत शेयर केल्याशिवाय, तुम्ही चॅटिंग करू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. प्ले स्टोरवर सध्या WA bubble for chat या अॅपच्या मदतीने असे केले जावू शकते. यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर जावून तुम्हाला WA bubble for chat अॅप डाऊनलोड करावा लागेल.
त्यानंतर अॅप अनेक अॅक्सेसिबिलिटी परमिनशन्स मागेल. त्यावर तुम्हाला allow करावे लागेल.
आता व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजेस तुम्हाल बबल्स मध्ये येतील.
या ठिकाणी चॅटिंग तुम्हाला कुणालाही ऑनलाइन दिसणार नाही. तसेच ऑफलाइन राहून तुम्ही सहज चॅटिंग करू शकाल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button