ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार चालकाने सांगितलं आग लागली अन् ४० प्रवासी…

परभणी | शहरापासून जवळच असलेल्या ब्राह्मणगाव फाटा परिसरात लातूरवरून  नागपूरकडे जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. ही थरारक घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील जवळपास ४० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, आगीमध्ये ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एम. एच 40 वाय 91 35 क्रमांकाची सैनिक ट्रॅव्हल्स लातूरवरून नागपूरकडे जात होती. मात्र ट्रॅव्हल्स परळीहून गंगाखेडकडे जात असताना नादुरुस्त झाल्यासारखी वाटत होती. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या चालकाने गंगाखेडमध्ये आल्यानंतर गाडीचे टायर तपासून पाहिले. यानंतर गाडी परभणीकडे पुढील प्रवासासाठी रवाना केली. यादरम्यान ब्राह्मणगाव फाटा परिसरात ट्रॅव्हल्स पेट घेतला. मात्र सदरील बाबा ट्रॅव्हल्स चालकाच्या लक्षात आली नाही. पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने आग लागली असल्याचे सांगितले. हे लक्षात येताच ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. त्यामुळे प्रवासी थोडक्यात बचावले. धावपळीमध्ये एक प्रवासी किरकोळ जखमी झाला असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि परभणी शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button