breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

सीबीआयची टीम उद्या मुंबईत सुशांतच्या घराची पाहणी करणार

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर आता सीबीआयची टीम उद्या मुंबईत येणार आहे. ही टीम उद्या मुंबईत सुशांतच्या घराची पाहणी करून नंतर मुंबई पोलिसांचीही भेटही घेणार आहे.

सीबीआयने याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती. उद्या येणाऱ्या सीबीआय एसआयटीच्या टीममध्ये दोन एसपी आणि एका तपास अधिकाऱ्याचा समावेश आहे. ही टीम मुंबईत आल्यावर सुशांतच्या घराची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची भेट घेणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुशांतप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआय मुंबई पोलिसांकडून सुशांतप्रकरणाची केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालही घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पूर्णपणे सीबीआयकडे सोपवले आहे. या पुढे या प्रकणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button