breaking-newsमनोरंजन

दागिन्यांच्या फसवणूकीचा हीना खानवर आरोप

हीना खान आणि वादाचे समिकरण तसे न सुटणारे आहे. आता ती नव्याने वादामध्ये सापडली आहे ते फसवणूकीच्या आरोपाखाली. हीनावरील या फसवणूकीच्या आरोपाची बातमी एका चॅनलने प्रसिद्ध केली. त्यावरून नेटकऱ्यांनी हीनाची यथेच्च चेष्टा करायला सुरूवात केली आहे. ज्वेलरीच्या एका कंपनीने हीना खानवर हा आरोप केला आहे. ज्वेलरीच्या प्रमोशनसाठी हीना तब्बल 12 लाख किंमतीचे दागिने घेऊन गेली.

दागिन्यांचे प्रमोशन तर झाले. पण प्रमोशननंतर हीनाने हे दागिने कंपनीला परतच केले नाहीत, असा या कंपनीचा आरोप आहे. आता हे दागिने कंपनीला 15 दिवसांच्या आत परत करण्यात यावेत, यासाठी हीनाला एक कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. मात्र आपल्या नोटीस मिळालीच नाही. ही नोटीस प्रसार माध्यमांकडेच पाठवण्यात आल्याचे एक ट्‌विट हीनाने पोस्ट केले आणि आपली बदनामी करण्यासाठी आपल्या शत्रुंनी हे कारस्थान केल्याचा उपरोधिक शेराही तिने दिला आहे.

स्वतःचे समर्थन करण्याचा हा तिचा केविलवाणा प्रयत्न होता. हीनाला ही नोटीस कोणत्या ज्वेलरी ब्रॅन्डने पाठवली याचा खुलासा बातमीमध्ये होऊ शकलेला नाही. त्यामुळे या बातमीत किती तथ्य आहे याची खातरजमा होऊ शकली नाही. हीना अशाप्रकारे दागिने हडपण्याचा प्रयत्न करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, त्यामुळे हीनाच्या फॅन्सनाही तिच्या या वर्तवणूकीबाबत आश्‍चर्यच वाटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button