breaking-newsआंतरराष्टीय

ऐतिहासिक भेट ! ट्रम्प-किम यांच्यात ५० मिनिटे चर्चा

सिंगापूर: अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांचे प्रमुख भेटण्यास तयार झाले होते. दरम्यान, सगळ्या जगाचे लागलेली अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची भेट आज मंगळवारी अखेर झाली. सिंगापूरमधील कॅम्पेला हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते भेटले. त्यांच्यात तब्बल ५० मिनिटे चर्चा झाली.

भारतीय वेळेनुसार, सकाळी साडेसहा वाजता ट्रम्प-किम यांच्यातील चर्चेला सुरुवात झाली. या ऐतिहासिक भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचं कौतुक केलं. किम यांच्यासोबतची चर्चा खूपच चांगली झाली. कोणतीही मोठी समस्या आम्ही दोघे चुटकीसरशी सोडवू शकतो. दोघेही एकत्र आल्यास यश हमखास मिळू शकतं आणि तो दिवस लवकरच येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील. किम यांच्या भेटीमुळं खूपच आनंदित आहे, असं ट्रम्प म्हणाले.

‘सिंगापूरमध्ये होणाऱ्या या बैठकीच्या वाटेत अनेक अडथळे होते. ते अडथळे पार करून इथं पोहोचलो,’ असं किम म्हणाले. दरम्यान, या दोन्ही नेत्यांची भेट यशस्वी ठरल्यास सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेला वाद संपुष्टात येऊन या दोन्ही देशांमधील मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल, असे जाणकारांकडून सांगण्यात येतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button