breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

काही बडे सेलिब्रिटी अडकणार

मुंबई – आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अरबाज खानचे नाव समोर आले असून त्याची चौकशी झाल्यामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणात सहा जणांना अटक झाली असली तरी पुढच्या काही दिवसांत आणखी काही बडे मासे सट्टेबाजीच्या या जाळ्यात अडकण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखी यांनी दिली. अरबाजची जबानी आम्ही नोंदवून घेतली आहे. तसेच आणखी काही नवीन नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांच्याविरोधातही कारवाई करू, असे अभिषेक त्रिमुखी यांनी सांगितले.

बीसीसीआयचा संबंध नाही 
अरबाज खानच्या बेटिंग प्रकरणाशी भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (बीसीसीआय) किंवा इंडियन प्रिमियर लीगचा काहीही संबंध नाही, असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्‍ला यांनी शनिवारी स्पष्ट केले. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. बीसीसीआय आणि आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी पथके आहेत. पोलीस त्यांच्याशी समन्वय साधून सल्लामसलत करू शकतात, असे शुक्‍ला यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button