breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ऐकवं ते नवलंच’ : पिंपरीतील भाजप कार्यकर्त्यांचा पालिकेच्या उद्यानातील माशांवर ‘डल्ला’

  • राजकीय पदाधिका-यांचे खुळचट वागणे चव्हाट्यावर
  • ते ऐकताच पिंपरी-चिंचवडकरांनी घातले तोंडात बोट

पिंपरी ! महाईन्यूज ! प्रतिनिधी

आजपर्यंत चोरट्यांनी दुचाकी, सोनसाखळी, रोकड, मोबाईल अशा वस्तुंवर डल्ला मारल्याचे प्रकार आपण ऐकले असतील. परंतु, ‘ऐकावं ते नवलंच’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये अनोखा चोरीचा प्रकार घडला आहे. सत्ताधारी भाजपच्या एका उच्च पदाधिका-याच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या उद्यानातील तलावातल्या पाळीव माशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. राजकीय पदाधिका-यांच्या अशा पातळीहीन खुळचट वागण्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर मात्र तोंडात बोट घालण्याचीच वेळ आली आहे.

संभाजीनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘बर्ड व्हॅली’ उद्यानातील तलावात मासे सोडले आहेत. माशांची संख्या मोठी असल्याने उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या लोकांना ते सहज दिसतात. उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी ‘बर्ड व्हॅली’ उद्यानातील छोट्या-छोट्या गोष्टी विकसीत केल्या आहेत. त्यापासून पिंपरी-चिंचवडकरांना उद्यानात आल्यानंतर अप्रतिम आनंद मिळावा, ही त्यापाठीमागचा हेतू आहे. परंतु, अशा काही अनोख्या गोष्टींवर राजकीय व्यक्तींची वकृदृष्टी पडेल असे कधी पिंपरी-चिंचवडकरांना स्वप्नात सुध्दा वाटले नसावे. असाच किळसवाना प्रकार दोन दिवसांपूर्वी घडल्याने तो राजकीय क्षेत्रातील उच्च पदस्त व्यक्तींच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

तो राजकीय पदाधिकारी कोण ?

दोन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील ‘बर्ड व्हॅली’ उद्यानातील तलावात असणारे काही मासे गायब झाले आहेत. हे मासे गेले तरी कोठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, या माशांवर पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या एका उच्च पदाधिका-यांच्या कार्यकर्त्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. या उच्च पदस्त व्यक्तीवरच अख्या शहराच्या देखभालीची धुरा आहे. त्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना येथील मासे काढून आणायला सांगितले, अशी सुप्त चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. परंतु, या पदाधिका-याचे नाव उघडपणे घ्यायला कोणी तयार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button