breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; रखडलेला पगार लवकरच मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती, तर काही कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं होत. कोरोना व्हायरसमुळं उदभवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा फटका एसटी महामंडळाला चांगलाच बसलाय.

अत्यावश्यक सेवा पुरवूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, आता हे चित्र बदलताना दिसणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिलीये.

मुंबईत एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती देत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून ५५० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचं परब यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button