breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

एम. जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवला

नवी दिल्ली –  केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवला आहे. मात्र, अद्याप हा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही.

#Metoo प्रकरणात एम. जे. अबकर यांच्यावर १३ महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश आहे. त्यामुळे, भारतात परत येताच विमानतळावरच पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यावेळी, आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अकबर यांनी पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिवांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा दिल्याचे समजते.

दरम्यान, अकबर यांनी राजीनामा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवांनी त्यांच्या राजीनाम्याची नोंद केल्याचीही माहिती आहे. आतापर्यंत १३ महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप एम. जे. अकबर यांच्यावर केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button