ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अखेर ‘त्या’ नग्न मृतदेहांचा उलगडा

दिघी परिसरातील मॅगझीन चौकात असलेल्या एका लॉजमध्ये एका जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत आढळून आले. हा प्रकार गुरुवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिस तपासणीत मयत तरुणाने महिलेचा गळा आवळून खून करून नंतर स्वतः साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.अजंठानगर झोपडपट्टी येथे राहणारा 28 वर्षीय तरुण तर त्याच परिसरात राहणारी 35 वर्षीय महिला या दोघांचे मृतदेह आढळले दिघी येथील लाॅजमध्ये नग्नावस्थेत सापडले.

पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे आणि महिलेचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत तसेच महिलेच्या पतीच्या विरोधात देखील गुन्हे दाखल असून त्यात याधीच अटक करण्यात आली आहे. सध्या महिलेचा पती चार वर्षांपासून कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तरुण आणि महिला मॅगझीन चौकातील एका लॉजमध्ये आले. त्यांनी येताना कॅरीबॅगमधून पार्सल जेवण आणले होते. रात्री ते लॉजमधील खोलीच्या बाहेर आले नाहीत, गुरुवारी सकाळी ते लॉज सोडून जाणार होते. मात्र सकाळी देखील बराच वेळ झाला तरी ते बाहेर येत नसल्याने लॉज व्यवस्थापक बाळू नवसागर यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेहच नग्नावस्थेत आढळून आले.

उत्तरीय तपासणीत महिलेचा गळा आवळून खून झाला तर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. लॉजमध्ये असताना दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला असावा आणि त्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दिघी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button