breaking-newsपुणे

नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी

पुणे – वाढत्या प्रवाशांमुळे लोहगाव विमानतळाचा विस्तार करण्याबरोरच सुविधा वाढवण्यात येत आहेत. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असून विमानतळावर प्रसाधनगृह उभारणीपासून ते टर्मिनलच्या विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. याचाच एक भाग असलेल्या लोहगाव विमानतळाच्या नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल निविदेला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती प्राधिकरणाकून देण्यात आली.

शहरात दिवसेंदिवस हवाई वाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर विमानतळावर नवनव्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे देशभरातील महत्त्वाच्या विमानतळांवर विविध विकासकामे करण्यात येत आहेत. यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. यामध्ये विमानतळच्या विस्तारीकरणासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या नवीन इंटीग्रेटेड टर्मिनलची निविदा मंजूर झाली असून आय.टी.डी सेमेन्टेशन इंडिया लिमिटेड या कंपनीला 358.89 कोटींना हे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 30 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. नवीन इंटीग्रेटेड टर्मिनलच्या कामास गती मिळणार असून त्याच्या निर्मितीमुळे विमानतळ पूर्ण क्षमतेने चालवण्यास मदत होणार असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button