breaking-newsपुणे

‘एक पुस्तक’ उपक्रम; बालभारतीचा पुढाकार

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असलेले एकच पुस्तक काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही शाळांमध्ये सुरूवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय श्किणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती एक पथदर्शी प्रकल्पही बालभारतीने आणला आहे.

दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘एक पुस्तक, एक वही’ ही अभिनव कल्पना राबविली होती. या प्रकल्पाची सुरूवात २६ जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्ष शाळांमध्ये करण्यात आली.

एका शाळेतील सहावीच्या ५० विद्यार्थ्यांची पुस्तके चार भागात विभागली होती. सर्व विषय एकाच स्पायरल बायंडिंग केलेल्या फाईलमध्ये समाविष्ट करून एकच पुस्तक तयार केले होते. सर्व पुस्तके व या एका पुस्तकाचे वजन यामध्ये खूप फरक होता. याबाबत शाळांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सातत्याने प्रयत्न केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button