breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘एक्स-रे’ मशीन स्फोट : डॉक्टर आणि ‘एक्स-रे’ सेंटरला मागितला खुलासा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. शार्वी भूषण देशमुख असे या चिमुकलीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पिंपरीमध्ये ही घटना घडली. या घटनेत चिमुकलीची आई आणि आजोबा देखील किरकोळ जखमी झाले. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी डॉक्टर आणि एक्स-रे सेंटरला खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. खुलासा आल्यानंतर शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. साळवे यांनी सांगितले.

हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि एक्स-रे सेंटर विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. शहरातील न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शार्वीची MCU टेस्ट करण्यासाठी आई आणि आजोबा तीला घेऊन गेले होते. दरम्यान, शार्वीला इंजेक्शन देण्यात आलं त्यानंतर टेस्ट सुरू झाली. मात्र, अचानक एक्स-रे मशीनचा काचेचा भाग फुटून आवाज झाला. तसेच, मशीनमधून धूर आणि रसायन बाहेर निघाले. फुटून आवाज झाल्याने मशीनमधील रसायन शार्वीच्या अंगावर उडाले यात ती जखमी झाली.

तर आई आणि आजोबांच्या देखील अंगावर हे रसायन उडाल्याने यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. शार्वीची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी दिली. डॉक्टर आणि सेंटरच्या हलगर्जीपणा विरोधात शार्वीच्या आई-वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत. तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागतील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी संबंधीत डॉक्टर आणि एक्स-रे सेंटरला याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा येताच त्याची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. साळवे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button