breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘प्रिन्सविले’ बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेची दंडात्मक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. आपण राहत असलेल्या घरात व सोसायटीमध्ये तसेच, आजुबाजुच्या परिसरात डेंग्यू सदृष्य आळ्या आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात पाहणी केली. डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली. तसेच, पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.

डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवारी (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही. के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली.

डास नियंत्रण, जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. लेबर कॅम्प अथवा बांधकामाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करणेत आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button